पाचोरा : बँकेत वारसाचे खोटे दाखले दाखवत व बनावट सहि व अंगठे घेवून महिलेची 12 हजारांची फसवणूक करण्यात आली. याबाबत तीन जणांविरोधात पाचोरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तिघांविरोधात गुन्हा दाखल
पाचोरा तालुक्यातील वरखेडी येथील जिल्हा बँकेच्या शाखेत संशयीत आरोपी आनंद शंकर वाघ, अभिमन शंकर वाघ आणि गोविंद महादू पाटील (सर्व रा.लोहारी, ता.पाचोरा) यांनी संगनमताने कल्पना रवींद्र शिंदे (पाळधी, ता.जामनेर) व त्यांच्या नातेवाईकांची फसवणूक करत त्यांच्या वारसाची रकमेसाठी बनावट सह्या, अंगठे मारून बँकेतील रक्कम वर्ग करून फसवणूक केली. या प्रकरणी कल्पना शिंदे यांनी पाचोरा पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून संशयीत आरोपी आनंद शंकर वाघ, अभिमन शंकर वाघ आणि गोविंद महादू पाटील (सर्व रा.लोहारी, ता.पाचोरा) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास हवालदार नरेंद्र शिंदे करीत आहे.