बबन झोटे यांना मनपात समाविष्ट करावे

0

धुळे । बबन झोटे यांना महापालिकेत समाविष्ठ करुन घ्यावे, अशी मागणी भारिप बहुजन महासंघाकडून आयुक्तांना देण्यात आलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. आयुक्त यांनी यासंदर्भात योग्य ती कारवाई न केल्यास भारिप बहुजन महासंघाकडून न्याय मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही या निवेदनात देण्यात आला आहे.

मुख्यमंत्री कार्यालयाचे दुर्लक्ष
निवेदन देतेवेळी जिल्हाध्यक्ष भैय्यासाहेब पारेराव, मिलिंद वाघ, विजय भामरे, निलेश आहिरे, गौतम बोरसे, योगेश बेडसे आदी उपस्थित होते. यावेळी मनपा प्रशासनाचा भारिप बहुजन महासंघाकडून निषेधही करण्यात आला. बबन यशवंत झोटे हे कंत्राटी कर्मचारी म्हणून महापालिकेत काम करीत होते. अनेक वर्षापासून त्यांनी महापालिकेत काम केले. महापालिकेतील वरिष्ठ अधिकार्‍यांनी बबन झोटे यांना कामावरुन कमी केले. यामुळे त्यांच्या परिवारावर उपासमारीची वेळ आली आहे. इतकी वर्षे महापालिकेत सेवा देऊनही एखाद्या कर्मचार्‍याला कामावरुन काढल्याने त्याच्या परिवाराची वाताहात होते. बबन झोटेंनी त्यांच्यावर झालेल्या अन्राराविरोधात औद्योगिक न्यायालयाकडे दाद मागितली होती. त्यावेळेस औद्योगिक न्यायालयाने झोटे यांना कामावर घेण्यासंदर्भात महापालिकेशी संपर्क साधला होता. परंतु महापालिकेतील अधिकार्‍यांनी सदर प्रकरणाच्या विरोधात उच्च न्यायालयात अपील दाखल केली होती. यामुळे झोटे हे काही दिवसापासून अस्वस्थ होते. महापालिका प्रशासनाने त्यांच्यावर जो अन्याय केला त्या विरोधात मुख्यमंत्र्यांकडेही तक्रार दाखल केली होती.