बभळाज येथे ‘लुपिन ह्युमन वेलफेअर’तर्फे स्वच्छता पंधरवाडा

0

बभळाज । लुपिन फाऊंडेशन व बभळाज ग्रामपंचायत व प्रगती महिला ग्रामसंघ यांच्या संयुक्त विद्यमाने आज गावात स्वच्छता पंधरवाड्या निमित्ताने विविध जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यात स्वच्छता फेरी रांगळी स्पर्धा, गावात साफसफाई करणे, हात धुणे न नखे काढणे यांचे प्रात्यक्षिक देण्यात आले. शौचालय बांधणेबाबत जागरूकता आदी कार्यक्रमाचा समावेश होता. याप्रसंगी बभळाज सरपंच निर्मला महाजन, ग्रामपंचायत सदस्य, लुपिनचे तालुका समन्वयक संदीप तोरवणे, प्रगती ग्रामसंघाचे पदाधिकारी, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक, अंगणवाडी सेविका व शाळेचे विद्यार्थी व स्वंय सहायता बचत गटाच्या महिलांची उपस्थिती होती.

महिला बचत गटातर्फे प्रभातफेरीद्वारे जनजागृती
प्राथमिक शाळेतील विद्यार्थी व बचत गटातील महिला यांची स्वच्छता संदेश देणारी स्वच्छता फेरी गावातून काढण्यात आली. यात विविध जनजागृतींपर घोषणा देण्यात आल्यात. यानंतर विठ्ठल मंदिर व परिसर, ग्रामपंचायत कार्यालय, ग्रामसंघ कार्यालय, सामाजिक सभागृह, शाळा व अंगणवाडी पररिसर, बस स्टँड व परिसराची स्वच्छता करण्यात आली. याप्रसंगी आरोग्य व स्वच्छता या विषयांवर रांगोळी स्पर्धेंचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेंत 15 महिलांनी सहभाग घेतला. विद्यार्थ्यांना स्वच्छता व आरोग्याबाबत मार्गदर्शन प्राथमिक शिक्षक किरण पाटील यांनी केले. यावेळी संजय धनकर यांनी आभार मानले. संस्थेचे तालुका समन्वयक संदीप तोरवणे यांनी मार्गदर्शन केले. यानंतर रांगोळी स्पर्धेंचे बक्षीस वितरण सरपंच निर्मला महाजन, मुध्यापक व तालुका समन्वयक संदीप तोरवणे व ग्रामसंघ पदाधिकरी यांच्या हस्ते वितरीत करण्यात आले.