बर्लिन फिल्मोत्सवात ‘गली बॉय’चा वर्ल्ड प्रीमियर

0

बर्लिन : बॉलीवूडचा बाजीराव रणवीर सिंग बॉलीवूडची चुळबुळी अभिनेत्री आलिया भट्ट आणि कल्कि कोचलिन यांच्या भूमिका असलेला झोया अख्तर यांचा ‘गली बॉय’ चित्रपटाचा वर्ल्ड प्रीमियर ६९ व्या बर्लिन चित्रपट महोत्सवात होणार आहे. हा महोत्सव ७ ते १७ फेब्रुवारी २०१९ या तारखांना होणार आहे.

‘यह मेरा बॉम्बे’ चित्रपटामुळे प्रसिध्दीस आलेल्या रॅपर डिवाईनच्या जीवनावर आधारित हा चित्रपट असणार आहे. हा चित्रपट १४ फेब्रुवारी रोजी रिलीज होणार आहे.