A Purse Containing 46,000 was Extended from The Nagpur-Pune Special Train भुसावळ : मध्य प्रदेशातील बर्हाणपूर येथील दौलतराव पांडुरंग पाटील हे ट्रेन (क्रमांक 10444) नागपूर-पुणे स्पेशल गाडीने भुसावळ ते पुणे प्रवास करीत असताना भुसावळ स्थानक सुटल्यावर सीटवर ठेवलेली पर्स चोरट्याने लंपास केली.
लोहमार्ग पोलिसात गुन्हा
पर्समध्ये दोन हजार रुपये रोख व 18 हजारांचा मोबाईल असा 26 हजार रुपयांच्या ऐवजासह अन्य साहित्य मिळून एकूण 46 हजार रुपयांचा मुद्देमाल होता. या प्रकरणी शुक्रवारी लोहमार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. हवालदार सुभाष पाटील पुढील तपास करीत आहे.