भुसावळ- बर्हाणपर लोहमार्ग पोलिस ठाण्यात शस्त्र प्रकरणातील पसार आरोपीच्या मुसक्या आवळण्यात बाजारपेठ पोलिसांच्या डीबी शाखेला यश आले आहे. शेख इरफान शेख बशीर (21, रा.मिलत नगर, भुसावळ) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. आरोपीविरुद्ध बर्हाणपूर लोहमार्ग पोलिसात गुरनं.194/2015 आर्म अॅक्ट कलम-25 (ब) नुसार गुन्हा दाखल होता शिवाय त्याच्याविरुद्ध पकड वॉरंटही काढण्यात आले मात्र आरोपी मिळून येत नव्हता. आरोपी शहरात आल्याची माहिती मिळाल्यानंतर अपर पोलिस अधीक्षक लोहित मतानी, पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड, बाजारपेठ निरीक्षक देविदास पवार यांच्या मार्गदशनाखाली कॉन्स्टेबल विकास सातदिवे व रवींद्र तायडे यांनी त्यास अटक केली.