भुसावळ । भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त शहर व परिसरातील विविध शासकीय, शैक्षणिक, सामाजिक व राजकीय संस्था तसेच संघटनांतर्फे ध्वजारोहण करण्यात आले.
शासकीय ध्वजारोहण
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर शासकीय कार्यक्रमात सकाळी 9.15 वाजता प्रांताधिकारी डॉ. श्रीकुमार चिंचकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी आमदार संजय सावकारे, तहसिलदार मिनाक्षी राठोड, डीवायएसपी निलोत्पल, नायब तहसिलदार संजय तायडे, उपनगराध्यक्ष युवराज लोणारी, लालाजी ढिवरे, वैद्य रघुनाथ सोनवणे, जे.बी. कोटेचा, राजू खरारे, प्रकाश फालक, प्रविणसिंग पाटील, शहरातील प्रतिष्ठीत नागरीक, नगरसेवक उपस्थित होते. ध्वजारोहण झाल्यानंतर पोलीस पथकाने परेडचे सादरीकरण केले. या परेडमध्ये होमगार्ड, अर्जुना संघटनेचे जवान, शाळेच्या विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या वेशभूषा करुन देशभक्तिपर सजीव देखावे सादर केले. यानंतर उत्कृष्ट देखावे सादर करणार्या विद्यार्थ्यांना पारितोषिक देवून सन्मानित करण्यात आले.
शहर काँग्रेस कमिटी
शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने नेहरु मैदानावर 9.35 वाजता संजय खडसे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस अभिववादन करुन ध्वजारोहण करण्यात आले. चिमुकल्यांना मिठाई वाटप करण्यात आली. यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष रविंद्र निकम, रहिम कुरेेशी, महेश फालक, अनिता खरारे, भिमराव तायडे, विलास खरात आदी उपस्थित होते.
अहिल्यादेवी कन्या विद्यालय
अहिल्यादेवी कन्या विद्यालयात संस्थेचे उपाध्यक्ष सोनू मांडे यांच्या हस्ते भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन व ध्वजारोहण करण्यात आले. विद्यार्थीनींनी बॅन्डच्या तालावर राष्ट्रगीत, ध्वजगीत व देशभक्तिपर गीत सादर केले. 62 व्या शालेय राष्ट्रीय टेनिस बॉल क्रिकेट संघात सहभागी झालेल्या कामिनी सपकाळ व तिच्या पालकांचा सोनू मांडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
जनाधार पार्टीतर्फे डॉ. आंबेडकरांना अभिवादन
प्रजासत्ताकदिनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताचे संविधान लागू केले असल्यामुळे जनाधार पार्टीच्या वतीने पक्षाचे गटनेता उल्हास पगारे व नगरसेवक यांनी पालिकेसमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेेळी नगरसेेवक दुर्गेश ठाकूर, आशिकखान शेरखान, सिकंदर खान आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
म्युनिसिपल हायस्कूल
येथे उपनगराध्यक्ष युवराज लोणारी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी मुख्याधिकारी बी.टी. बाविस्कर, नगरसेविका शैलजा नारखेडे, नगरसेवक किरण कोलते, पुरुषोत्तम नारखेडे, युवराज नरवाडे, मुख्याध्यापिका एम.यु. गोल्हाईत, पर्यवेक्षक के.एम. चौधरी उपस्थित होते. सुत्रसंचालन सिमा भारंबे यांनी केले. ध्वजसंचलक प्रदिप साखरे यांनी केले. यशस्वीतेसाठी उत्सव समिती चेअरमन नाना पाटील यांनी परिश्रम घेतले.
नगरपालिका कार्यालय
पालिका कार्यालयात 10.15 वाजेच्या सुमारास नगराध्यक्ष रमण भोळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी आमदार संजय सावकारे, उपनगराध्यक्ष युवराज लोणारी, मुख्याधिकारी बी.टी. बाविस्कर, विरोधी गटनेते उल्हास पगारे, गटनेता मुन्ना तेली, नगरसेवक निर्मल कोठारी, प्रा. दिनेश राठी, किरण कोलते, राजेंद्र आवटे, आशिकखान शेरखान, आर.बी. भवार यांसह नगरसेवक व कर्मचारी उपस्थित होते. ध्वजारोहणानंतर गरिबांना पालिकेतर्फे अन्नदान करण्यात आले व काही विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.
रेल्वे क्रीडांगण
रेल्वे क्रीडांगणावर सकाळी 7.30 वाजेच्या सुमारास मध्य रेल्वेचे प्रबंधक सुधिरकुमार गुप्ता यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर रेल्वे सुरक्षा दलाच्या पथकाने परेड सादर केली. यावेळी श्वान पथकानेही आपली कर्तबगारी दाखविली. याप्रसंगी ध्वजारोहणाला एडीआरएम अरुणकुमार धार्मिक, एसडीपीओ, डीपीओ, एसडीको यांसह अधिकारी व कर्मचारी वृंद उपस्थित होते.
गोपाळ अंगणवाडी
शहरातील खळवाडी परिसरातील गोपाळ बालवाडीत संचालिका अंजली महाजन यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यानंतर राष्ट्रगीत म्हणून मानवंदना देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. परिसरातून चिमुकल्या विद्यार्थ्यांची प्रभातफेरी काढण्यात आली. विद्यार्थ्यांनी घोषणा दिल्याने परिसर दणाणला. दर्पणा कुलकर्णी, मनिषा कुलकर्णी, पद्मीनी नाटकर आदी उपस्थित होत्या.