पुणे-पुण्यात बलात्काराच्या आरोपीने तुरुंगातच गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. घोडेगाव पोलीस स्टेशनच्या तुरुंगात या आरोपीने गळफास घेतला. सुलदास उर्फ कुक्या काळे असे आरोपीचे नाव होते. तो मूळचा श्रीगोंदा येथील आहे. आरोपीवर बलात्काराचा आरोप होता. मंचर पोलिसांनी त्याला अहमदनगर पोलिसांकडून ताब्यात घेतले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, सुलदास उर्फ कुक्या काळे याने संध्याकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास पोलीस कोठडीतच गळफास घेऊन आत्महत्या केली. आरोपीने गतवर्षी लांडेवाडी येथील घरात दरोडा टाकून ४५ वर्षीय महिलेवर बलात्कार केला होता. त्याला अहमदनगर पोलिसांनी अटक केली होती. मंचर पोलिसांनी त्याला अहमदनगर पोलिसांकडून ताब्यात घेतलं आणि न्यायालयीन कोठडी घेतली होती.