पुणे : १७ वर्षाच्या महाविद्यालयीन तरुणीवर बलात्कार करुन हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. तरुणीवर बलात्कार करत तिचा गळा आवळून हत्या करण्यात आली आहे.
मृत मुलगी अकरावीला होती. गुरुवारी सकाळी सर्व कुटुंबीय नेहमीप्रमाणे घराबाहेर पडले होते. मृत तरुणी दुपारी १ वाजताच घरी आली होती. त्यानंतर सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास छोटा भाऊ आला असता, त्याला त्याची बहीण बेडवर निपचित पडल्याची दिसली. त्यानंतर त्याने आई-वडिलांना याची माहिती दिली असता, त्यांनी तातडीने डॉक्टरांना बोलावले. मात्र, डॉक्टरांनी तिची तपासणी केली असता, तिचे मृत्यू झाल्याचे सांगितले.
मुलीच्या कुटुंबीयांची परिस्थिती हलाखीची आहे. आई-वडिल कामावर गेल्यानंतर मुलीवरअत्याचाराचा प्रयत्न केला. त्यावेळी तिने विरोध केल्याने गळा दाबून तिचा खून करण्यात आला, अशी शक्यता पोलिसांनी सांगितली आहे.