बलात्कार केल्याप्रकरणी कोठडी

0

पुणे । लग्नाचे आमीष दाखवत अल्पवयीन मुलीला पळवून नेत तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी एकास 11 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. दत्तात्रय उर्फ आप्पा बाळू थोपटे (26, रा. भोर) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी 17 वर्षीय पीडित मुलीच्या वडिलांनी भोर पोलिसांत फिर्याद दिली होती. थोपटे याने पीडित मुलीला लग्नाचे अमीष दाखवले व अपहरण करून तिच्यावर बलात्कार केला. तपासा दरम्यान पीडित मुलगी गरोदर असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास करण्यासाठी सरकारी वकिलांना थोपटे याच्या पोलिस कोठडीची मागणी केली होती.