शिरपूर। मटाटी, झूल घुंगरू, बाशिंगाने सजलेल्या शेतकर्यांचा सखा तोरणाखाली उभा राहिला वर्षभाराच्या परीश्रमाचे सार्थक झाले क्रुषी संस्कृतीचा महत्वाचा सण बळसाणेसह माळमाथा परिसरात मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. यावर्षी साक्री तालुक्यावर कोरड्या दुष्काळाचे सावट आहे.
गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता असलेल्या पावसाचे 20 रोजी रात्री दहा वाजता दमदार आगमन झाले. शेतकर्यांनी मरगळ झटकून पोळा साजरा करण्याचे ठरविले. आपल्या लाडक्या बैलाला रंगीबेरंगी करून सजावट केली. सोमवारी पोळ्याची धामधूम बळसाणे गावात दिसून येत होती. माळमाथा परिसरात पोळा या सणाला उत्साहाला उधाण आले होते. बैलांना सजवून तोरणाखाली आणले जात होते. बळसाणेसह परिसरात पोळा सण साजरा करण्यात आला. पोळा फुटल्यानंतर घरोघरी शेतकर्यांसह महिलांनी बैलांचे पूजन करून पुरणपोळी चा नैवेद्य दाखविण्यात आला. माळमाथा परिसरात पावसाअभावी दुःखाचे डोंगर उभे आहे ते दुःख सावरून शेतकर्यांनी आपल्या शेतात राबराब राबणार्या बैलांचा सन्मान केला.