बसच्या खिडकीतून उडी मारून अट्टल आरोपी पसार

0

अमळनेरची घटना ; आरोपीचा जिल्हाभरात कसून शोध

अमळनेर- जिल्हा कारागृहाच्या भिंतीवरून उडी टाकून दोन कैदी पसार झाल्याची घटना ताजी असतानाच बसच्या खिडकीतून उडी टाकून आरोपी पसार झाल्याने खळबळ उडाली आहे. अमळनेर बसस्थानकावर गुरूवारी सायंकाळी ही घटना घडली. शुभम मनोज देशमुख ऊर्फ दाऊद असे पसार आरोपीचे नाव असून त्याचा जिल्हाभरात कसून शोध सुरू आहे. आरोपी दाऊद उर्फ शुभमला जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने अटक केल्यानंतर त्यास न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली होती. आरोपीची कोठडी संपल्यानंतर त्यास पुन्हा न्यायालयात हजर केले असता त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्याचे आदेश दिल्यानंतर पोलिस कर्मचारी जीवन बंजारा, रमेश पाटील, दीपक पाटील, प्रसाद जोशी त्याला गुरूवारी सायंकाळी साडेसहा वाजता बसने जळगावकडे घेऊन जात असताना आरोपीने बसच्या मागील खिडकीतून बाहेर उडी मारून धुम ठोकली.