बसच्या मागणीसाठी राजुरीच्या विद्यार्थिनी धडकल्या कुर्‍हाकाकोडा पोलिस दूरक्षेत्रात

0

मुक्ताईनगर- राज्य सरकारने विद्यार्थिनींसाठी मोफत पासची सुविधा दिली असलीतरी तालुक्यातील राजुरा गावातील विद्यार्थिनी मात्र बसपासून वंचित ठरत असल्याने समस्या सोडवण्याच्या मागणीसाठी विद्यार्थिनी कुर्‍हाकाकोडा पोलिस दूरक्षेत्रात धडकल्या. मुक्ताईनगर आगारप्रमुखांनी या गंभीर विषयाकडे लक्ष देऊन बस सुरू करण्याची मागणी प्रसंगी करण्यात आली. तालुक्यातील कुर्‍हाकाकोड्यासह मुक्ताईनगर येथे महाविद्यालय व शाळा असून राजुर्‍याच्या विद्यार्थिनी शिक्षणासाठी येथे येतात मात्र राजुरा या गावामध्ये महामंडळाची बस येत नसल्याने विद्यार्थिनींचे शैक्षणिक नुकसान होत आहे. राजुरा गावात पहाटेची साडेसहा वाजेची व सकाळी 11 वाजेची बस सुरू करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. यापूर्वी गावात बस येत असलीतरी ती अचानक बंद करण्यात आल्याने विद्यार्थिनींनी कुर्‍हा दूरक्षेत्रात पोलिस कॉस्टेबल भगवान पाटील, संतोष कात्रे मेजर यांची भेट घेत समस्या सोडवण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.