नवी दिल्ली : बसपा – सपा युतीनंतर काहीजणांच्या पोटात दुखू लागले असून त्यामुळेच असे लोक समोरून न लढता जातीवादी माध्यमांचा सहारा घेऊन आमची बदनामी करीत आहेत. असा आरोप आज मायावती यांनी एका पत्रकार परिषदेद्वारे केला. आपण भाचा आकाश कुमार याला पक्षामध्ये स्थान देणार असून यामुळे त्याला राजकारण शिकण्यास मदत होईल. असंही मायावती यांनीं सांगितले.
काही दिवसांपासून मायावतींच्या लहान बंधूंचा मुलगा आकाश सिंग हा महत्वाच्या घडामोडींवेळी मायावतींसमवेत दिसून आल्याने आता बहुजन समाज पक्षामध्ये देखील घराणेशाहीला सुरुवात झाली की काय? असा प्रश्न काही प्रसार माध्यमांनी उठवला होता. मायावतींवर लावण्यात आलेल्या या आरोपांना आता थेट मायावतींकडून सडेतोड उत्तर देण्यात आले आहे.