बसमध्ये चढताना 75 हजारांचे सोने लंपास ; पारोळा बसस्थानकातील प्रकार

0

पारोळा- बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी बॅगेला ब्लेड मारत चोरट्यांनी तब्बल 75 हजार 600 रुपयांची व 31.5 ग्रॅम वजनाचे सोने लांबवल्याची घटना बुधवारी सकाळी 9.45 वाजता पारोळा बसस्थानकावर नाशिक-जळगाव बसमध्ये घडली. सीसीटीव्ही तक्रारदार प्रवाशाशेजारी तीन महिला असल्याचे निष्पन्न झाले असून त्यांनी चोरी केल्याचा पोलिसांना संशय आहे. जळगावचे रीयाज शेख कासम खाटीक (48, जळगाव) हे पारोळा येथे नातेवाईकांकडे लग्नासाठी कुटुंबासह आले होते. 5 रोजी सकाळी ते जळगाव जाण्यासाठी नाशिक-जळगाव बसमध्ये चढत असताना चोरट्यांनी त्यांच्या बॅगेला ब्लेड मारत सोने ठेवलेला डब्बा लांबवला. त्यात सोन्याचे पेंडल, बाळ्या, कानातील साखळ्या, आयरींग, अंगठी असा एकूण 75 हजार 600 रुपयांचा ऐवज होता. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन सानप यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.