बसमध्ये प्रवाश्याचा हृदयविकाराने मृत्यू

0

जळगाव : बसमध्ये प्रवास करतांना एका प्रवासीचा मृत्यू झाल्याची घटना सायंकाळी 5.30 वाजेच्या सुमारास घडली. ही घटना बांभोरीजवळ घडली. रविंद्र धर्मचंद्र संचेती (वय 50) हे मयत प्रवाश्याचे नाव आहे. रविंद्र संचेती हे धुळे येथील न्हाळोद मोहाडी येथील रहिवाशी आहेत. ते जोशी ट्रान्सपोर्टमध्ये आहेत. धुळे येथून ट्रान्सपोर्टच्या कामानिमीत्त संचेती जळगावात आले. दिवसभर आपले कामे आटोपुन ते बसने परतीच्या प्रवासाला निघाले. जळगाव नवीन बसस्थानकावर आल्यानंतर संचेती जळगाव धुळे या विना थांब्याच्या (एम.एच.20 बी.एल.2483) बसमध्ये बसले. जळगावकडून धुळेकडे बस निघाली. जळगावातुन बस निघत नाही तोच संचेती यांच्या छातीत दुखणे सुरु झाले. दरम्यान बांभोरी इंजेनिअरिंग कॉलेजच्या समोर संचेती यांना उलट्या झाल्या. यावेळी अचानक ते बेशुध्द पडले. बसचे वाहकांसह चालक व इतर प्रवाश्यांनी तत्काळ रुग्णवाहिकेला बोलाविले. रुग्णवाहिकेव्दारे संचेती यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. याठिकाणी संचेती यांना वैद्यकिय अधिकार्यांनी मृत घोषित केली.