Bus Truck Aaccident Near Rawer Town : Driver Slightly Injured रावेर : रावेरहून जळगावी निघालेली बस आणि ट्रक यांच्यात झालेल्या अपघातात बस चालक किरकोळ जखमी झाला. हा अपघात मंगळवारी घडला. अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली.
बसच्या फुटल्या काच्या
रावेरकडून जळगावच्या दिशेने जाणारी बस (एम.एच.40 एम.9834) व रावेरच्या दिशेने येणारा ट्रक (क्रमांक डी.डी.03 एम.9432) यांच्यात धडक झाली. या घटनेत बस चालक किरकोळ जखमी झाला तर बसच्या काचा फुटल्या. या अपघाताबाबत रावेर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्याचे काम सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होते.