बसचालकांसह चाहन चालक कमालीचे त्रस्त
शहादा – पालिकेमार्फत जुने रस्ते दुभाजक तोडून नवीन दुभाजक उभारण्यात आले आहेत. बसस्थानकासमोरील असाच नवीन दुभाजक वाहतूकीसाठी अडचणीचा ठरत असून यामुळे छोट्या मोठ्या अपघातांची संख्या वाढली आहे, वाहतूकीला अडथळा ठरणाऱ्या या दुभाजकामुळे बसचालकांसह चाहन चालक कमालीचे त्रस्त झाले अहेत. शहरात पंधरावर्षापूर्वी महत्वाच्या वाहतूकी रस्त्यांवर दुभाजक बलविण्यात आले होते. असे दुभाजक वाहतूकीसाठी अडचणीचे ठरत असल्याने पालिकेने ते हटवून नव्याने दुभाजक निर्मितीचा निर्णय घेतला होता. त्याअनुषंगाने शहरातील दोंडाईचा रस्ता व खेतियारोडवरील जुने दुभाजक तोडून त्याजागी नवीन दुभाजक तयार करण्यात आले आहेत. त्यांना रंगरंगोटी करण्यात आली आहे. याम दुभाजक अडचणीचा ठरत आहे. बसस्थानकात प्रवेश करतांना व बाहेर निघतांना बसचालकांना या दुभाजकामुळे मोठी कसरत करावी लागते, असली वळविणे मोठे कठीण जाते. अशाच वेळी वाहण वळवितांना तसा धोक्का या दुभाजकाला नसतो, यामुळे बसचे आणि दुभाजकाचे ही नुकसान झाल्याच्या घटना घडल्या आहेत.