बसस्थानक मार्गावरील नाल्यातील दुर्गंधीमुळे व्यापारी व रहिवाशांचे आरोग्य धोक्यात

0

नवापूर । शहरातील बसस्थानक मार्गावरील नाल्यातील दुर्गधीने शहरवासी हैराण झाले आहेत गेल्या कित्येक वर्षापासुन नाले सफाईच झालेेली नसल्याने शहरवासीयांना अंत्यत दुर्गधी वासाला सामोरे जावे लागत आहे.पावसाळ्या पुर्वी नगर पालिकेने नाले सफाई करण्याची मागणी होत आहे. नागरिकांकडून विविध भागात नालेसफाईची मागणी दरवर्षी करतो मात्र ती केली जात नाही गेल्या काही महिन्या पासुन नाल्यातुन खुपच दुर्गधी येत असुन ती असह्य झाली आहे याकडे नगर पालिकेने लक्ष देऊन उपाय योजना करावी अशी मागणी होत आहे.

अधिकारी-कर्मचारी-नागरिकांचा वावर नाल्यातूनच
बसस्थानक रस्त्यावरुन प्रत्येक नागरीकाला या नाल्यावरुनच रोज ये जा करावे लागते गेल्या काही महिन्या पासुन या नाल्यातुन खुपच घाण वास येत असुन या नाल्या जवळुन जातांना प्रत्येकाला दुर्गधी वासाला सामोरे जावे लागत आहे नाल्याचा पुढे बसस्थानक,शाळा,काँलेजस,बाजार पेठ,अन्य शासकीय कार्यालये आहेत तसेच महापुरुषाचा पुतळा जवळच आहे नगर पालिका तसेच शौचालय आहे नगर सेवक पासुन शासकीय अधिकारी, पालिकेचे कर्मचारी,अधिकारी,याच नाल्यावरुन येजा करतात रोज पहाटे सांयकाळी व रात्री शतपावली व फिरायला जाणार्‍यांचे दुर्गंधीने स्वागत होते.

गावाचे प्रवेशद्वार दुर्गंधीयुक्त
शहर प्रवेशाचे ते मुख्य दालन असतांना प्रवेशातच दुर्गधी वासाने बाहेर लोकांचे स्वागत होत असेल तर ते नवापुरचे काय नाव घेऊन जातील हा विचार करावा यात लोकांची मानसिकता वाईट आहे या नाल्या जवळच असलेले भाजी विक्रीते,व्यापारी हे रोज सांयकाळी सडलेला भाजीपाला कचरा नाल्यात टाकतात तसेच जवळचे रहिवाशी देखील कचरा नाल्यात टाकत असतात या नाल्यात खुपच घाण,डुकरांचा वावर व सांडपाणी असल्याने कालांनतरांने आज या नाल्यातुन असह्य अशी दुर्गधी येत असल्याने शहराचे ऩागरीक व या नाल्याजवळील व्यापारी यांचे आरोग्य खतरेमे आहे, अशी स्थिती निर्माण झाली आहे.

रहिवाशांचे आरोग्य टांगणीला…
पावसाळ्या पुर्वी नगर पालिकेने नाले सफाई करणे आवश्यक होते मात्र तसे न झाल्याने नाले परिसरात दुर्गधी पसरली असल्याचा आरोप येथील रहिवाशांनी केला आहे तसेच नाल्यात संरक्षण भिंत नगर पालिकेने बांधली मात्र तेथील रेती कपची व इतर मटेरियल तेथुन उचलले नाही त्यामुळे नाल्यात अधिकच अस्वच्छता पसरली आहे नाल्यात अनेक भागात काटेरी झुडपे वाढली असुन नाल्यात का़ही भागात अतिक्रमण होत आहे यामुळे पुढचा काळात सर्वच नाले अतिक्रमणाचा जाळ्यात येऊन नाल्याचे अतिस्वच संपणार आहे ते चित्र भविष्यात पाहायला मिळणार आहे शहरातील नाले घाण व दुर्गधी त असुन या भागातील रहिवांशीचे आरोग्य सलाईनवर
आहे.

आरोग्य व स्वच्छते बाबत नगर पालिका लक्ष ठेवुन आहे. दोन दिवसा पासुन नगर पालिके तर्फे नाले सफाई करण्याचे काम सुरु असुन लवकरच बसस्थानक मार्गावरील दुर्गधीयुक्त नाल्यातील संपुर्ण साफ सफाई करण्यात येणार आहे. आरोग्य निरिक्षकांना तशा सुचना मी दिल्या आहेत.
-विश्‍वास बडोगे
आरोग्य सभापती नगर पालिका नवापूर