◆ रोज हजारो परप्रांतीय मजुरांचा वाढतोय लोंढा
◆ बसेसची संख्या वाढवली
◆ कलेक्टरसह एसपीनी केली पाहणी
नवापूर: येथील आरटीओ चेक पोस्टवरुन परप्रांतीय मजुरांना त्यांच्या राज्याच्या सीमावर्ती भागापर्यंत सोडण्यासाठी एसटी महामंडळाने बस सेवा सुरू केली आहे. कोणीही पायी आपल्या गावी जाणार नाही याची दक्षता घेतली जात आहे.प्रारंभी कमी मजूर आल्याने एक दोन बसेस सोडण्यात येत होत्या. मात्र, गेल्या दोन-तीन दिवसापासून परप्रांतीयांचे संख्या हजारोवर पोहचली.आरटीओवर जणु मजुरांची यात्रा भरली असून एसटी महामंडळाला नियोजन करण्यात अडचणी येत होत्या. नंतर आगार प्रमुख राजेंद्र अहिरे यांनी चांगल्या पध्दतीने नियोजन करत बस सेवा सुरळीत केली. वाढती संख्या झपाटयाने कमी होत गेली. दरम्यान जिल्हाधिकारी डाँ. राजेंद्र भारुड व जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत यांनी येऊन पाहणी केली. एसटी बस सेवा मजुरांना देवदूत ठरली आहे. दिवसेंदिवस मजुरांची वाढती संख्या पाहून बसेसची संख्याही वाढवली असून बस स्थानक ते कॉलेज रोडपर्यंत लांबच बस पाहुन बसची यात्रा भरली आहे, असे चित्र आहे.
बसेस उभी करण्यासाठी परिसरात जागा अपूर्ण
तीन विभागातून शहरात सुमारे ते 250 ते 300 बसेस आल्या आहेत. बस स्टॅन्ड कॉलेजपर्यंत अक्षरशः बसच बस दिसत आहे. बसेस उभी करण्यासाठी परिसरात जागा अपूर्ण पडत असून विविध भागात विभागातुन टप्प्याटप्प्याने बसेस उभे करण्यात येत आहे.
औरंगाबाद विभागातून चालकासह जळगाव, धुळे विभागातून बसेस आल्या आहेत. नवापूर चेक पोष्टवर ही बसेस आहेत. गुजरात राज्यातील सुरत, अहमदाबाद, बडोदा या भागातील परप्रांतीय मजूर रोज महाराष्ट्र गुजरातच्या सीमावर्ती भागात येत आहेत. त्यांना सोडण्यासाठी एसटी महामंडळातर्फे बसेस सुरू आहेत. आतापर्यंत एक ते दीड हजार बसमधून तीस ते चाळीस हजार प्रवाशांना त्यांचा गावी सोडण्यात आले आहे. दुसरीकडे बसचालक व वाहकांचे रात्री हाल होत आहेत. त्यांच्या भोजनासह निवासासाठी कुठलीही व्यवस्था करण्यात आली नाही. चालक व वाहकांना मिळेल त्या ठिकाणी उघड्यावर रात्र काढावी लागत आहे. नवापूरहुन लांब शहरात इतर राज्यात जाण्यासाठी लांब प्रवास करावा लागतो. तसेच येण्या-जाण्यासाठी तीन दिवस लागतात.
चालकासह वाहकाची गैरसोय
चालक व वाहकांना रस्त्यात लाँकडाऊनमुळे जेवण मिळत नसल्याने त्यांची गैरसोय होत आहे. नवापूर बेडकी चेक पोस्ट व शहरातील मेन रोडवर चालक-वाहकांना उन्हात उभे रहावे लागत आहे. काही चालकांना दुपारी जेवण मिळाले नाही. त्यामुळे जे मिळेल त्याने भुक भागवत आहे.वरिष्ठांनी नवापूरला जास्तीच्या बस पाठविल्या आहेत. शहरातील मेन रोडच्या दोन्ही बाजूला बसेस उभ्या असल्याने जिकडे तिकडे बसेस दिसत असून वाहतुकीला अडथळा येत आहेत.कोरोनाशी सामना करतांना एसटी महामंडळ देवदुताची भुमिका बजावत अाहे.