बस-पिकअप वाहनात अपघात : चौघे ठार, तिघे जखमी

औरंगाबाद : भरधाव पिकअप चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ती डिव्हायर ओलांडर प्रवासी बसवर आदळून झालेल्या अपघातात चौघे ठार झाले तर तिघे जखमी झाले. हा अपघात जालना रोडवरील गाढे जवळगाव फाट्यावर बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास झाला. मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे.

नियंत्रण सुटल्याने अपघात
भरधाव वेगाने एक पिकअप जीप (एम.एच. 21 बी.एच. 4331) जालन्याकडून औरंगाबादच्या दिशेने येत असताना गाढे जालना रोडवरील जवळगाव फाट्यावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने पिकअप अचानक दुभाजकावर चढून रस्त्याच्या दुसर्‍या बाजूस गेली. याच दरम्यान जालन्याकडे जाणारी पुणे-कळमनुरी बस समोर आली. बस चालकाने प्रसंगावधान राखत डाव्या बाजूला बस घेतली. मात्र पिकअप बसवर आदळली. यात चार जण जागीच ठार झाल्याची प्राथमिक माहिती आहे. तर तिघे जण गंभीर जखमी आहेत. मृतांची संख्या आणखी वाढू शकते असा प्रत्यक्षदर्शींचा अंदाज आहे. अपघात एवढा भीषण होता की पिकअपचा समोरील भाग पूर्णपणे चेंदामेंदा झाला आहे.