बहिणाबाई महोत्सव-२०१७ ची तयारी अंतीम टप्प्यात

0

जळगाव : भरारी फाऊंडेशन आयोजित करण्यात आलेल्या बहिणाबाई महोत्सव २०१७ ची अंतिम तयारी पूर्ण झाली आहे. या महोत्सवात खान्देशासह राज्यभरातील २२० महिला बचत गटाने आपला सहभाग नोंदविला आहे. शनिवार ११ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५.३० वाजता सिनेअभिनेत्री केतकी माटेगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत व जैन उद्योग समुहाचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन होईल. तसेख शहरासह जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांची देखील यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती राहणार आहे.

१२ जणांना बहिणाबाई पुरस्कार जाहीर
भरारी फाऊंडेशनच्यावतीने बहिणाबाई महोत्सवाच्या निमित्तान गत तीन वर्षापासून बहिणाबाई पुरस्कार देण्यात येतात. यावर्षीही समितीने १२ जणांना बहिणाबाई पुरस्काराचे पुरस्कार जाहीर केली आहे. यात निशा पाटील (राष्ट्रीय बालशौर्य पुरस्कार प्राप्त), अपंग क्षेत्र मिनाक्षी निकम (चाळीसगाव), शिक्षण क्षेत्र ज्योती श्रीवास्तव, मिनल जैन (जळगाव), सांस्कृतिक क्षेत्र डॉ.अपर्णा भट- कासार, सामाजिक क्षेत्र हेमंत बेलसरे (जळगाव), उद्योग संगिता पाटील (जळगाव), पत्रकारिता व प्रसार माध्यम क्षेत्र विशाल पाटील (जळगाव), प्रशासकीय सेवा अनिल भोकरे (कृषी, जळगाव), अभिजीत भांडे (महसूल, जळगाव), विस्तार अधिकारी सुजाता बोरसे (नंदुरबार), लक्ष्मण सपकाळे (जळगाव) यांचा समावेश असून यांना पुरस्कार देवून सन्मानित करण्यात येणार आहे.

बहिणाबाई स्त्रीशक्ती सन्मान
महिला विकासाच्या क्षेत्रात काम करणार्‍या जळगाव शहर सह जिल्ह्यातील कार्यरत महिला मंडळ सामाजिक संस्था युवक मंडळ यांचा बहिणाबाई स्त्रीशक्ती सन्मान देवून गौरव करण्यात येणार आहे. यावेळी जिल्हाभरातील ३५ महिला मंडळे, संस्था, युवा मंडळ यांची निवड करण्यात आली आहे. उद्घाटन सोहळ्याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते या मंडळांना सन्मानपत्र देवून गौरवण्यात येणार आहे. तसेच याप्रसंगी शहरातील विविध मान्यवरांच्याहस्ते पुरस्कार देवून सन्मान करण्यात येणार आहे.

विविध खाद्य पदार्थाचे स्टॉल
बहिणाबाई महोत्सवाचे खास आकर्षण म्हणजे खाद्य महोत्सव या महोत्सवात महिला बचत गटामार्फत मोठ्या प्रमाणात खाद्य पदार्थाचे स्टॉल लावण्यात येणार आहेत. खान्देशातील विविध खाद्य संस्कृती बरोबरच विदर्भ, मराठवाडा या भागातील विशेष खाद्य पदार्थांचा आस्वाद जळगावकरांना घेता येणार आहे. भवरलाल अ‍ॅण्ड कांताबाई जैन मल्टीपर्पज फाउंडेशन क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महिला विकास मंडळ यांच्या मुख्य प्रायोजकत्वाने व जळगाव महानगरपालिका, ऑर्कीड हॉस्पीटल, लक्ष्मी अ‍ॅग्रो, महाराष्ट्र बँक, कृषी विभाग, धनलक्ष्मी ज्वेलर्स, प्रेपोर्शनर सपनभाई झुनझुनवाला, जळगाव पिपल्स बँक, ऑर्यन फाउंडेशन यांच्या विशेष सहकार्याने महोत्सवाची अंतिम तयारी झाली असून अंदाजे लाख जळगावकर नागरिक या महोत्सवाला भेट देणार आहेत.