मुंबई : नवीन वर्षाचा स्वागत करण्यासाठी कतरीना कैफने लंडनमध्ये सेलिब्रेशन केले. कतरीनाने लंडनमधला तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. आणि हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.
लंडनमध्ये कतरीनाने नदी किनाऱ्यावर तिच्या बहिणींसोबत धमाल वेळ घालवला. ‘लंडनमधल्या कडाक्याच्या थंडीतही पाण्यात पोहण्याची मजा काही औरच’, असे कॅप्शन तिने या व्हिडिओवर दिले आहे.