पुणे:- बहिणीला त्रास देत असल्याच्या रागावरून पुण्यातील विश्रांतवाडी येथे एकाचा खून केल्याची घटना घडली. रविवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास 24 वर्षीय तरुणाला दगडांनी ठेचून मारण्यात आले. ही घटना शहरातील विश्रांतवाडी येथे घडली असून पोलिसांनी सर्व आरोपींना अटक केली आहे.
अक्षय गागोदेकर असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. इंद्रजित गायकवाड याच्या बहिणीसोबत अक्षय ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ मध्ये राहत होता. अक्षय आपल्या बहिणीला त्रास असल्याची तक्रार इंद्रजितच्या कानावर आली होती. तो राग मनात धरून इंद्रजितने आपल्या साथीदारासह रविवारी अक्षय वर दगडांनी हल्ला केला. अक्षयला वाचवण्यासाठी आलेला त्याचा मित्र हल्ल्यात जखमी झाला आहे.
घटनेची माहिती मिळताच गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शोध मोहीम सुरू करून काही तासातच आरोपींना खडकी येथील होळकर पुलाजवळचया ख्रिश्चन स्मशानभूमी परिसरातून अटक केली. अटक केलेल्यांमध्ये इंद्रजित गायकवाड 23, निलेश शिगवन 24, विजय फ़ंड 25, सागर गायकवाड 17, कुणाल चव्हाण 22 या पाच जणांना अटक करण्यात आली आहे.