अमळनेर। येथील प्रांताधिकारी कार्यालयावर बहुजन क्रांती मोर्चा शेतकरी कर्ज मुक्तीच्या घोषणा देत विविध मागण्यांसाठी काढण्यात आला. प्रांताधिकारी संजय गायकवाड यांना क्रांती मोर्चाच्या संयोजन समिती तर्फे निवेदन देण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास अभिवादन करून बहुजन क्रांती मोर्चास सुरुवात करण्यात आली. सुभाष चौक, नगरपरिषद, स्टेट बँक, स्टेशन रोड, मंगलमूर्ती पतपेढी, कोर्ट मार्गे, विश्रामगृह, धुळेरोड, प्रांताधिकारी कार्यालयावर घोषणा देत बहुजन क्रांतीचे मोरचेंकरी पोहचले. याप्रसंगी प्रांताधिकारी यांच्यासमोर विविध मागण्या प्रा.शिवाजीराव पाटील यांनी मांडल्या व निवेदन देण्यात आले.
संघटनेच्या या आहेत मागण्या
निवेदनात शेतकर्यांच्या शेतिमालास हमीभाव द्या, ऍट्रॉसीटीचा कायदा अधिक कडक करा, ऍट्रॉसीटीचा दुरुपयोग करणार्यांवर गुन्हे दाखल करा, महिलांवरील वाढते अत्याचार रोखण्यासाठी कायदे कडक करावे यांसह आदी मागण्यांसह विविध मागण्यांचा समावेश होता. याप्रसंगी मोर्च्या चे तालुका प्रभारी बाळासाहेब सोनावणे, बीएमपीचे अध्यक्ष संदिप सैंदाने, साहेबराव शेजवळ, पंकज पाटील, राजाराम बडगुजर, प्र. जितेंद्र संदनशिव, राजू सैंदाने, प्रा.विजय गाढे, कमलाकर संदनशिव, किशोर गव्हाणे, किरण बहारे, अर्जुन संदनशिव, शंकरराव तेलंग, संजय मरसाळे, गौतम सपकाळे, रविंद्र सोनवणे, मनोहर पाटील आदी उपस्थित होते.