भुसावळ। बहुजन क्रांती मोर्चा संयोजन समितीची बैठक सेवानिवृत्त गटविकास अधिकारी आर.पी. तायडे यांच्या निवासस्थानी नुकतीच पार पडली. बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. शहरातून काढण्यात आलेल्या बहुजन क्रांती मोर्चात विविध संघटनांनी परिश्रम घेतले होते.
मोर्चाच्या यशस्वितेसाठी समर्पित भावनेने कार्य करणार्या कार्यकर्त्यांचा येत्या 28 रोजी सत्कार करण्यात येणार असल्याचे पदाधिकार्यांनी माहिती दिली. बहुजन समाजाच्या विविध न्याय्य मागण्यांच्या दृष्टीने शहरात मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चाला सर्वस्तरातून पाठिंबा मिळाल्यामुळे सत्कार केला जाईल. तसेच याच दिवशी ‘ओबीसी दशा व दिशा’ या विषयावर प्रबोधनात्मक व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी बहुजन क्रांती मोर्चा संयोजन समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.