मुंबई । भीमा-कोरेगावमध्ये झालेल्या घटनेनंतर बुधवार, 3 जानेवारी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन बंदची घोषणा केली. हा बंद शांततेत करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. राज्यात होणारा बंद समाजबांधवांनी शांततेत बंद पाळावा, कोणावरही जबरदस्ती करु नये. आम्ही कोणालाही आव्हान देत नसून प्रतिआव्हान म्हणून आम्ही शहर उघडत असल्याने हा बंद शांततेत पार पडावा, अशी आमची इतर संघटनांना विनंती करत प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. दरम्यान, दोषींना तात्काळ अटक करावी, अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली. शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे, हिंदू आघाडीचे मिलिंद एकबोटे आणि स्थानिक नेते घुगे यांच्यावर चिथावणी केल्याचा आरोप आंबेडकर यांनी केला.