बहुभाषी ब्राह्मण संघातर्फे परशुराम जयंती मिरवणूक उत्साहात

0

चाळीसगाव : भगवान परशुराम जंयती निमित्त बहुभाषिक ब्राह्मण समाजातर्फे 18 रोजी बलराम व्यायाम शाळेपासून शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी 5.30 वाजता शोभायात्रेची सुरुवात झाली. भगवे फेटे परीधान केलेले समाज बांधव शोभा यात्रेत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ही शोभायात्रा उत्साहात पार पडली. समाजातील मान्यवरांच्या हस्ते परशुरामांच्या प्रतिमेचे पूजन यावेळी करण्यात आले.

मान्यवरांच्या हस्ते पूजन
शहरातील टिळक चौकातील लक्ष्मी नारायण मंदिरापासून सकाळच्या सुमारास मोटारसायकल रॅली काढण्यात आली होती. हातात भगवा ध्वज, फेटा, अग्रभागी सजविलेल्या जीपवर भगवान परशुराम यांची प्रतिमा, फेटेधारी महिला मिरवणुकीत होत्या. 250 ते 300 मोटारसायकली रॅलीत सहभागी झाल्या. ब्राह्मण संघाचे अध्यक्ष चंद्रशेखर उपासणी यांनी हिरवी झेंडी दाखविली. वे.शा.सं.सचिन देशपांडे, दीपक जोशी यांनी सुत्रसंचालन केले. सायंकाळी 5.30 वाजता बलराम व्यायाम शाळेपासून शोभायात्रा काढण्यात आली. महिला लेझीम व महिला ढोल पथक मिरवणुकीचे खास आकर्षण होेते.

याशिवाय एकाच गणवेशातील फेटेधारी पुरूष व महिला, घोडे पथक, बॅण्ड पथक तसेच शिस्तबद्ध पद्धतीचे संचलन यामुळे मिरवणूक शहरवासियांचे आकर्षण ठरली. बलराम व्यायाम मंदिर, नेताजी चौक, नम्रता डेअरी, कचेरी, सिग्नल चौक, बसस्थानक, अंधशाळा, करगावरोड परत बलराम व्यायाम शाळा यामार्गे शोभायात्रा काढण्यात आली. सजविलेल्या वाहनावर भगवान परशुराम यांची प्रतीमा होती. मिरवणुकीत आमदार उन्मेष पाटील यांनी प्रतीमा पूजन केले. शोभायात्रेची सांगता व्यायामशाळेच्या पटांगणावर करण्यात आली. यावेळी परशुराम महाराजांच्या प्रतिमेचे पूजन माजी आमदार राजीव देशमुख, संपदा पाटील, वसंत चंद्रात्रे, अध्यक्ष चंद्रशेखर उपासणी, प्रा.ल.वि.पाठक, डॉ.हेमांगी पूर्णपात्रे, माजी नगरसेवक गोपाल दायमा आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले सुत्रसंचालन संगीता देव यांनी केले.