बहुमत कुणालाच नाही

0

बहुतांशी ओपिनियन पोलमध्ये त्रिशंकूचा अंदाज
कर्नाटक विधानसभा निवडणूक

नवी दिल्ली : कर्नाटक विधानसभेच्या 224 पैकी 222 जागांसाठी शनिवारी 70 टक्के मतदान झाल्याची प्राथमिक महिती आहे. मतदानाची टक्केवारी, दिवसभरातील कल या आधारे विविध वृत्तवाहिन्या आणि एजन्सीने कर्नाटक निवडणुकीचा एक्झिट पोल जाहीर केला आहे. यामध्ये कुठल्याही एकाच पक्षाला बहुमत मिळणार नाही असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. मात्र, काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरेल, असा अंदाज बहुतांश एक्झिट पोलने वर्तवला आहे. एबीपी-सी व्होटर आणि रिपब्लिक टीव्हीने भाजपाला झुकते माप दिल्याचे दिसून येत आहे.

एक्झिट पोलचा अंदाज
एजन्सी- पक्ष – जागा
* न्यूज एक्स-सीएनएक्स
काँग्रेस 72-78, भाजपा 102-110, जेडीएस 35-39, अन्य 3-5
* न्यूज 18 लोकमत
काँग्रेस 90-103, भाजपा 80-93, जेडीएस 31-39, अन्य 2-4
* एबीपी-सी व्होटर
काँग्रेस 89 ते 99, भाजपा 97 ते 109, जेडीएस 21 ते 30 आणि अन्य 1 ते 8
* रिपब्लिक टीव्ही
भाजपा 95 ते 114, काँग्रेस 73 ते 82, जेडीएस 32 ते 43
* सुवर्णा टीव्ही
काँग्रेस 106 ते 118, भाजपा 79 ते 92, जेडीएस 22 ते 30, अन्य-अपक्ष 1 ते 4
* इंडिया टीव्ही-व्हीएमआर
भाजप 87, काँग्रेस 97, जेडीएस 35, इतर 3
* इंडिया टुडे-अ‍ॅक्सिस
जनता दल धर्मनिरपेक्ष 22 ते 30, अन्य पक्ष 1 ते 4, भाजप 79 ते 92, काँग्रेस 106 ते 118