बहुळा प्रकल्पात उडी घेऊन तरूणाची आत्महत्या

0

पाचोरा – कुरंगी ता. पाचोरा येथील 28 वर्षाच्या युवकाने बहुळा प्रकल्पाच्या बिल्दी जवळील पुलावरून उडी घेऊन आत्महत्या केली,प्रकल्पात अत्याल्प जलसाठा असल्याने त्याचे डोक्याला जबरी मार लागल्याने तो जागेवरच ठार झाला, घटनेप्रकरणी पाचोरा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे, कुरंगी येथील योगेश एकनाथ कदम ह्याची घरची परिस्थिती नाजूक असल्याने तो जळगांव, भुसावळ, पाचोरा येथे भाजीपाला विकून उदर निर्वाह करीत होता. शनिवारी 2 फेब्रुवारी रोजी पहाटे पाचोरा येथे भाजीपाला विक्रीसाठी जातो असे सांगून गेला रात्री उशिरापर्यंत घरी पोहचला नाही. यामुळे नातेवाईकांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला. मात्र तिसर्‍या दिवशी त्याचा मृतदेह पाण्यावर तरंगत्या अवस्थेत आढळून आला. योगेश कदम याचा मोबाईल रस्त्यावर आढळून आल्याने चांदवड जळगांव महामार्गाचे काम सुरू असल्याने कामावरील मजुरांनी फोन वरून ओळख पटविली. मयतच्या पश्चात आई वडील, भाऊ, पत्नी व दोन लहान मुले असा परीवार आहे. या घटनेबाबत पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.