कोलंबो । बांगलादेश व श्रीलंका अध्यक्षीय एकादश संघात सराव वन-डे सामना रंगला होता.या सामन्यात बांगलादेश संघावर श्रीलंका अध्यक्षीय एकादशने 2 धावांनी निसटता विजय मिळवला. श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत 7 बाद 354 धावा केल्या.
श्रीलंकेकडून संदन वीरोकोडे याने सर्वाधिक 54 चेंडूंत 8 चौकार, 2 षटकारांसह 67 धावा केल्या. कौशल परेराने 78 चेंडूंत 64, चतुरंगा डिसिल्वाने 47 चेंडूंत 52, थिसारा परेराने 30 चेंडूंत 41 धावा केल्या. बांगलादेशकडून मोहंमद शफीउद्दीन आणि सनझुम इस्लाम यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरात बांगलादेशचा संघ 50 षटकांत 8 बाद 352 धावा करू शकला. त्यांच्याकडून शब्बीर रहमानने 63 चेंडूंत 11 चौकार, एका षटकारासह सर्वाधिक 72 धावांची खेळी केली. महमुदुल्लाहने 68 चेंडूंत 4 चौकार व एका षटकारासह नाबाद 71, मोसदक हुसैनने 53 व मुशर्रफा मोर्तजाने 35 चेंडूंत 58
धावा केल्या.