नागपूर : बांगलादेशचा नागरिक असलेला सालेहा परवीन अमजद हुसेन (41) हिने चक्क आधारकार्ड, पासपोर्ट बनविल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करून सालेहा परवीनला अटक करण्यात आली आहे. 2000 मध्ये ती भारतात आली. मोमिनपुर्यातील एमएलए कॅन्टीन परिसरात ती राहात होती.
हॉटेलमध्ये काम करणार्या परवीनने आधारकार्ड, पासपोर्ट, निवडणूक ओळखपत्र व रेशनकार्ड तयार केले होते. 18 वर्षांपासून ती अवैधपणे वास्तव्य करत होती. ही माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तिला अटक केली. तिला न्यायालयात हजर केले. न्यायालयाने तिची दोन दिवस पोलिस कोठडी घेण्यात आली आहे. तिला आधारकार्ड व पासपोर्ट कोणी बनवून देण्यास मदत केली याचाही शोध पोलिस घेत आहेत.