बांगलादेशाला 266 चे आव्हान

0

कार्डिफ । चॅम्पियन्स ट्रॉफीत न्यूझीलंड आणि बांगलादेशचा सामना होता. दोन्ही संघाला करो वा मरो अशी स्थिती आहे. त्यामुळे जो संघ जिकणार त्याला गुणतालिकेत अग्रक्रम मिळणार त्याचबरोबर जो संघ पराभूत होणार तो स्पर्धेतून बाहेर जाणार. बांगलादेशने इंग्लंडविरुद्ध पहिला सामना 8 विकेटनी गमावला होता. त्यांचा दुसरा सामनाही पावसामुळे रद्द झाला आणि त्यांना ऑस्ट्रेलियासोबत गुण वाटून घ्यावे लागले. दुसरीकडे, न्यूझीलंडचीसुद्धा हीच स्थिती आहे. ऑस्ट्रेलियासोबत त्यांचा पहिला सामनाही रद्द झाला होता आणि त्यांना गुण वाटून मिळाले. तथापि, दुसर्‍या सामन्यात त्यांचा इंग्लंडकडून 87 धावांनी पराभव झाला होता. सध्या ग्रुप ए मध्ये न्यूझीलंडचा संघ शेवटच्या स्थानावर असून दोन सामन्यांनंतर त्यांचा केवळ 1 गुण आहे. दुसरीकडे, बांगलादेश चांगल्या रनरेटसह तिसर्‍या स्थानावर आहे, त्यांनाही 1 गुण मिळाला आहे.कार्डिफमध्ये पाऊस सुरू असल्याने सामना उशिराने सुरू झाला.

शेवटी फलंदाज ढापाळले
न्यूझीलंड संघाने नाणेफेक जिकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.न्यूझीलंडकडून सलामीला मार्टिन गुप्तील, ल्यूक रोंची सलामीला आले.मार्टिने सुरवातीलपासून जोरदार फटके बाजी करण्यास सुरवात केली. 33 धावामध्ये 4 चौकार व 1 षटकार मारला.तर रोंची याने 16 धावात 2 चौकार मारले तो तस्किन अहमदने टाकलेला चेडू टोलविण्याच्या प्रयत्नात असतांना झेलबाद झाला.तो न्युझीलंड पहिला धक्का बसला.कर्णधार केन विलियम्सन याने धुरा सांभाळली.दोन्हीनी मिळून 69 वर संघाची धाव संख्या नेली.मात्र मार्टिन गुप्तील हा रुबेल हुसेन च्या चेडूवर पायचित बाद झाला.तो 33 धावांवर खेळत होता.रॉस टेलर व केन विलियम्सन यांनी धुरा सांभाळून दोन्ही फलंदाजांनी आप आपली अर्धशतके पुर्ण केली. संघाची धावसंख्या 152 वर असतांना केन विलियम्सन हा धाव घेण्याच्या नादांत धावबाद झाला.कर्णधार केन बाद झाल्यानंतर नील ब्रूम आला त्याने रॉस टेलरला चांगली साथ दिली दोघांनी मिळून 49 धावांची पार्टशिप केली.तस्किन अहमदच्या चेडूवर रॉस टेलरचा 63 धावांवर खेळत असतांना झेल बाद केले.जेम्स निशाम याच्यासह ब्रुम याने संघाची धावा संख्या वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवले.228 संघ असतांना मोसद्देक हुसेन याने ब्रुमला स्टपिंग केले.यानंतर आलेला कोरी अँडरसन हा शुन्यावर मोसद्देक हुसेन याने बाद केला.तर मिशेल सँटनर याने 14 धावा करित धाव चोरण्याच्या नांदत धावबाद झाला. अ‍ॅडम मिल्ने हा 7 धावा करून मुझफ्फर याच्या चेडूवर त्रिफळा उडाला. न्युझीलंडने 50 षटकात 265 धावा केल्या.त्यामुळे 6 अतिरिक्त धावा मिळाल्या.

मोसद्देक हुसेनने केले तिन गडी बाद
बांगलादेशा कडून गोलंदाजी करतांना कर्णधार मश्रफी मोर्तजा,शकीब अल हसन याला कोणतीही विकेट मिळाली नाही. रहेमान याने एक गडी ,तस्किन अहमद याने 2 गडी, रुबेल हुसेन याने 1गडी,मोसद्देक हुसेन सैकत याने 3 षटके टाकत 3 गडी बाद केले.याने सर्वाधिक कमी षटके टाकत कमी धावा देवून न्युझीलंडचे 3 फलंदाज तंबूत परत पाठवून चांगली कामगिरी केली.