बांग्लादेशावर कांगारूचा दबदबा

0

लंडन । बांगलादेश व ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना दोन्ही संघासाठी महत्वाचा होता. मात्र बांगलादेशाला ऑस्ट्रेलियाविरूध्दच्या सामन्यात विजय आवश्यक होता. जर त्याला या सामन्यात विजय मिळाला नाही. तर त्यांचा या ट्राफी मधील पुढील प्रवास खडतर होणार आहे.त्यामुळे बांगलादेशाला ऑस्ट्रेलियाविरूध्द विजय आवश्यक आहे. बांगलादेशाकडे फलंदाजी चांगली असली तरी त्याच्या जवळ विरोधी संघाला बांधून ठेवण्याची रणनिती नाही. त्याच्या गोलंदाजमध्ये ती धार नाही की, फलंदाजाला लवकरात लवकर तंबूत पाठू शकेल. बांगलादेशाने प्रथम नाणेफेक जिकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र बांगलादेशाचे सलामीवीर पाहिजे तसा खेळ करू शकले नाही. म्हणजे सुरवातीच्या ‘पावर प्ले’मध्ये बांगलादेशाला ऑस्ट्रेलियाच्या गोलांदाजानी बांधून ठेवले होते. त्यामुळे बांगलादेशाच्या फलंदाजांना पॉवर प्लेचा पाहिजे तसा फायदा उठवता आला नाही. बांगलादेशाने ऑस्ट्रेलियाला सर्व बाद 183 धावांचे लक्ष्य दिले आहे. यात तमीम इक्बाल याने 95 धावा काढून मात्र शतक हुकले.

कांगारूचा पहिल्यापासून बांग्लादेशावर दबाव
बांगलादेशाचा पहिला सामना इंग्लंडबरोबर झाला त्यात बांगलादेशाला पराभव पत्कारावा लागला होता. आता होणार्‍या या दुसर्‍या सामना बलाढ्य ऑस्ट्रेलिया नाणेफेक जिकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला असला तरी त्यांचे खेळाडून ऑस्ट्रेलियासामोर टिकाव लागला नाही. त्यांना फक्त 183 धावात सर्व बाद मध्ये समाधान मानावे लागले. बांगलादेश सलामीवीर तमीम इक्बाल व सौम्य सरकार फलंदाजीला आले. मात्र ऑस्ट्रेलिया गोलंदाजानी त्यांना धावा काढण्याची संधी दिली नाही. बांगलादेशाचा धावासंख्या 10 षटकात 37 होती. मुशफिकर रहीम खेळण्यास आला असता तो ही काही विशेष करू शकला नाही. त्याने 72 चेंडूत 51 धावा काढून आपले अर्धशतक पुर्ण केले. इक्बाल व हुसेन याच्या संयमी खेळी करित 69 धावांची भागीदारी केली. यानंतर रहेमान याने 14 चेडूत 8 धावांवर खेळत असतांना झम्पा याच्या चेंडूवर झेंलबाद झाला. त्यावेळेस 35 षटकात 142 धावांवर 5 फलंदाज बाद झाले होते. मुहमदुल्लाह हा खेळण्यासाठी आला असता त्याने 6 चेडू खेळणल्यानंतर षटकार मारून आपले इरादे स्पष्ट करून दिले. तर दुसरीकडे इक्बाल हा 99 चेडूत 80 धावांवर खेळून एकाकडून आपल्या संघाची बाजू सावरत होता.तर 37 व्या ओव्हरच्या शेवटच्या चेडूला जोरदार शॉर्ट मारण्याच्या नादांत मुहमदुल्लाह क्लिन बोल्ड झाला.तो 11 चेडू खेळून 8 धावा काढल्या हेात्या.संघाची धाव संख्या 42.2 चेडूवर 181 वर गेली असतांना इक्बाल षटकार मारण्यासाठी चेडू उचवला असतांना तो 95 धावांवर बाद झाला. त्याचे ऑस्ट्रेलियाविरूध्द शतक नोदवू शकला नाही. सर्वात मोठा इक्बाल या सेट झालेल्या फलंदाचा बाद करून दिला. तर पुढच्या चेडूवर रूबेल याचा क्लिन बोल्ड करून आपली हॉस्ट्रीक करू शकला नाही. मात्र स्टॉर्क याने आपल्या ओव्हर मध्ये तीन झटके बांगलादेशाला दिले.

बांगलादेश संघाचे झाले सर्व बाद
तमीम इक्बाल (95), सौम्य सरकार (3), इम्रुल कायेस (6), मुशफिकर रहिम (9), शकिब अल हसन (29), शब्बीर रेहमान (8), मोहम्मद मुहमदुल्लाह (8), मेहडी हसन (14), मश्रफी मुर्तझा (कर्णधार) (0), रुबेल हुसेन (0), मुस्ताफिझूर रेहमान नाबाद 1 धावा होत्या. अवघ्या 44.3 षटकात सर्व बाद झाले होते. ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज मिचेल स्टार्क याने दहा पैकी चार गडींना बाद करण्यात यश आले. तर अ‍ॅडम झॅम्पा याने दोन गडी बाद तर 41 षटकात तीन खेळाडूंना बाद करण्यात यश आले होते.