चिखली – बांधकामावरून खाली पडल्याने कामगाराचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (दि. 18) हॉट फूट स्पोर्ट अकॅडमी साईट मारुंजी येथे दुपारी चार वाजण्याच्या सुमारास घडला. दत्ता अशोक कांबळे (वय 32, रा. चिखली) असे साईटवर पडून मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. राधा कांबळे (वय 52, रा. चिखली) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली. त्यानुसार संजय मल्लू शिंगे (वय 40, रा. पिंपळे गुरव), रशीद उर्फ दिलदार अहमद बदबूय्या (रा. चिखली) आणि मित्तल इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. ली. कंपनीचा मालक यांच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
मित्तल इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. कंपनीचे एक बांधकाम मारुंजी येथे सुरु आहे. संजय आणि रशीद हे कामगारांकडून काम करत घेतात. सध्या साईटवर लोखंडी अँगलचे काम करण्यात येत आहे. हे काम अतिशय जोखमीचे आहे. तरीदेखील यासाठी कामगारांना हेल्मेट, सुरक्षित जाळी, सेफ्टी बेल्ट आदी कोणत्याही प्रकारची सुरक्षा साधने पुरविण्यात आलेली नाहीत. दत्ता शुक्रवारी याच साईटवर 25 फूट उंचीवर लोखंडी अँगलचे काम करीत होता. काम करत असताना त्याला अचानक चक्कर आली आणि तो खाली पडला. यामध्ये त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. यातच त्याचा मृत्यू झाला. यावरून काम करून घेणार्या आणि कंपनीच्या मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजय आणि रशीद यांना अटक करण्यात आली आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.