बांधकामावरून पडून चिंचवडचा कामगार ठार

0

चिंचवड : येथील सायन्स पार्क येथील तारांगण येथे काम करणार्‍या कामगाराचा सुमारे सोळा फूट उंचीवरुन कोसळून मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (दि.13) दुपारी दीड वाजता घडली. दिलवार खाल (वय 23 रा. अण्णासाहेब मगर वसाहती समोर, चिंचवड), असे मयताचे नाव आहे. याप्रकरणी सुपरवायजर शहाब खान (वय 38 रा. अण्णासाहेब मगर वसाहती समोर चिंचवड) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोहम्मद खान (वय 23 रा.चिंचवड) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

सुरक्षा साधनांचा अभाव
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिलवार हा शनिवारी तारांगण येथे काम करत असताना तोल जाऊन तो सुमारे सोळा फुटावरून खाली कोसळला. यामध्ये दिलावर याचा जागीच मृत्यू झाला. यामध्ये कामाच्या ठिकाणी कामगारांच्या जिविताची कोणतीच हमी न घेता त्यांच्यासाठी सेफ्टी बेल्ट, जाळी, हेल्मेट अशी कोणतीच सुरक्षा साधने न पुरवल्याबद्दल सुपरवायजर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी अद्याप सुपरवायजरला अटक केली नसून पुढील तपास पिंपरी पोलीस करीत आहेत.