बांधकाम करतांना मजूराचा मृत्यू

0

जळगाव । शिवाजीनगरातील उस्मानिया पार्कपरीसरात बांधकाम सुरू असलेल्या इमारतीचे काम करतांना स्लॅपचे चॅनल सटकल्याने 38 वर्षीय सेन्टींग काम करणार्‍या मजूर गंभीर जखमी झाला. जखमी अवस्थेत त्याला जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यापुर्वी मृत्यू झाल्यची घटना सोमवारी सकाळी 10 वाजेच्या सुमारास घडली असून शहर पोलीसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनेची माहिती कळताच नातेवाईक आणि मित्रपरिवाराने जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. मयत इक्बाल यांच्या कुटुंबियांचा आक्रोश मन हेलावणारा होता.

सिव्हीलमध्रे नातेवाईकांची गदी
इक्बाल हा नातेवाईकांसह मित्रमंडळीमध्ये शांत, मेहनती व मनमिळावू स्वाभावाचा होता. सुट्टीच्या दिवशीही तो कामावर जात असल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले. त्यांना आईवडील नसून पश्‍चात इब्राहिम पिंजारी, अहमद पिंजारी आणि लकीफ पिंजारी असे तिन भाऊ, एक बहिण पत्नी सैनाज पिंजारी आणि फकिरा पिंजारी, सोहेल पिंजारी आणि परवेज पिंजारी असे तीन मुले आहे. इक्बाल यांचे सासरवाडी खंडेराव येथे असल्याने ते सासरवाडीत राहत होते. मोठा भाऊ इब्राहिम पिंजारी धानोरा येथे राहतात तर अहमद आणि लकिफ हे दोन्ही भुसावळात राहात आणि बहिण शिवाजी नगर जवळील रेल्वे कॉटरमध्ये राहते.

दुसर्‍रा मजल्रावरून पडल्याने डोक्याला गंभीर दुखापत
मिळालेल्या माहितीनुसार, खंडेराव नगरात राहणार्‍या इकबाल फकिरोद्दिन पिंजारी (वय-38) मु. रा. धानोरा ता.चोपडा हा त्यांच्या मामसासरे ठेकेदार आयुब पिंजारी यांच्याकडे दहा वर्षांपासून काम करत होते. दैनंदिनी कामाप्रमाणे आज सकाळी शिवाजी नगरातील उस्मानिया पार्क परीसरात एका इमारतीच्या बांधकामासाठी गेले. दुसर्‍या मजल्यावरील स्लॅबचे काम सुरू असतांना सकाळी 9.15 वाजेच्या सुमारास लावलेले स्लॅबचे चॅनल सटकल्याने दुसर्‍या मजल्यावरून खाली पडला. या अपघातात इकबाल यांच्या डोक्याला लागून गंभीर रित्या जखमी झाला. बांधकामच्या इमारतीत काम करणार्‍या इतर मजूरांनी जखमी आवस्थेत इकबालला जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र दाखल करण्यापुर्वी त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकिय अधिकारी डॉ. विसपूते यांनी घोषीत केले. इकबालचा मृत्रू झाल्याचे कळाल्यानंतर जिल्हा रूग्णालरात नातेवाईंकांनी एकच धाव घेतली होती.