बांधकाम ठेकेदाराच्या खून प्रकरणी 4 संशयितांची चौकशी

0

 जळगाव। बांधकाम ठेकेदार श्रावण भगीरथ राठोड यांच्या खून प्रकरणात जिल्हा पेठ पोलिसांनी तपासाला वेग दिला असून बुधवार व गुरुवारी 4 संशयितांची चौकशी केली, त्यात एका महिलेचा समावेश आहे. राठोड यांच्या मृत्यूला शुक्रवारी आठ दिवस पूर्ण होत आहेत.

वीज बील भरण्यासाठी गेल्या शुक्रवारी 2 जून रोजी दुपारी घरुन निघालेल्या श्रावण राठोड या बांधकाम ठेकेदाराचा 3 जून रोजी सकाळी नवीन बसस्थानकाशेजारी असलेल्या महात्मा गांधी उद्यानात मृतदेह आढळून आला होता. राठोड याच्या गळ्याला बारीक तारेचे व्रण व तोंडातून फेस आलेला असल्याने हा घातपात असल्याचा संशय व्यक्त करुन पोलिसांनी त्याच दिशेन तपास सुरु केला.राठोड यांच्या संपर्कात असलेले तसेच त्यांच्याशी घटनेच्या दोन दिवस आधी कोणाकोणाचे बोलणे झाले, त्याची माहिती काढून त्यांची पोलिसांनी चौकशी केली. राठोड यांच्या खून प्रकरणात अनैतिक संबंधातून तर नाही ना? याची पोलिसांनी चौकशी सुरू केलेली आहे. त्यासाठी एका महिलेची चौकशी झाली असून आणखी एका महिलेचा पोलिसांनी शोध सुरू केला आहे. बुधवारी सकाळपासून रात्री उशिरापर्यंत 4 जणांची चौकशी झाली.