बांधकाम स्थळावरून चोरट्यांनी लांबवले जॅक

0
यावल :- यावल-भुसावळ रस्त्यावरील तालुक्यातील अंजाळे शिवारातील समृध्दि पार्क जवळून बांधकामासाठी वापरण्यात येत असलेले व 27 हजार रूपये किमतीचे 12 जॅक अज्ञात चोरटयाने  लांबवले. बुधवारी रात्री ही घटना घडली.
प्रत्येक जॅकची किमत अडीच हजार रूपये आहे. बामणोद येथील गोपाळ सीताराम सोनवणे यांनी यावल पोलीस ठाण्यात या प्रकरणी फिर्याद दिल्यावरुन अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक फौजदार नागपाल भास्कर करीत आहेत.