बांभोरीतील गजानन महाराज मंदिरात हरिनाम सप्ताहाची सांगता

जळगाव । बांभोरी येथील संत गजानन महाराज मंदिराचे संस्थापक-अध्यक्ष अण्णा महाराज पाटील यांचे मार्गदर्शन आणि प्रेरणेतून श्री संत गजानन महाराज मंदिरात अखंड ज्योत हरिनाम तथा श्रीमद् भागवत सप्ताहाची सांगता मंगळवारी, 21 डिसेंबर रोजी ह.भ.प. देवदत्त
मोरदे महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने करण्यात आली. तसेच
समाप्तीनिमित्त गजानन महाराज नगर परिक्रमा आणि ग्रंथदिंडीची मिरवणूक गजानन महाराज मंदिरापासून काढण्यात आली. यानिमित्त पहाटे काकडा आरती, दुपारी श्रीमद् भागवत कथा, सायंकाळी हरिपाठ तर रात्री हरिकिर्तन असे दैनंदिन कार्यक्रम घेण्यात आले.

रात्रीच्या कीर्तनात 14 डिसेंबर रोजी ह.भ.प. ईश्‍वरलालजी महाराज (पाळधी), 15 ला ह.भ.प. तेजस्वीनी पाठक (मलकापूर), 16 ला ह.भ.प. सविता ढाकणे (पैठण), 17 ला ह.भ.प. पल्लवी शिंदे (सोलापूर), 18 ला ह.भ.प. लक्ष्मण महाराज (खलाणे), 19 ला ह.भ.प. उषा महाराज (जळगाव), 20 ला ह.भ.प. शालिग्राम महाराज सुरडकर (भालेगाव बाजार) यांची कीर्तने झाली. तसेच ह.भ.प. पंडीत महाराज, ह.भ.प. मधुकर महाराज, ह.भ.प. गोपाल महाराज, ह.भ.प. गोरख महाराज, ह.भ.प. संतोष महाराज मराठे यांचेही दैनंदिन कार्यक्रमासाठी सहकार्य लाभले. सप्ताहाला अनेक
मान्यवरांनी उपस्थिती देऊन सप्ताहाचा पंचक्रोशीतील भाविकांनी लाभ घेतला. सप्ताहाच्या नियोजनासाठी व्यवस्थापक समिती, महिला सेवा मंडळ, सेवेकरी मंडळ, भजन सेवा आदींचे सहकार्य लाभले.

…………………………