जळगाव :- कुटुंबातील सदस्य कामानिमित्त घराबाहेर पडल्यानंतर घरात एकटे असल्याची संधी साधत विकी कोमल सोनवणे (19) रा,बांभोरी या तरूणाने गळफास घेऊआत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सकाळी 11.45 वाजेच्या सुमारास उघडकीस आली. आत्महत्ये मागचे कारण कळू शकले नाही ,परंतु नैराश्यातून तरूणाने आत्महत्या केली असावी, असा तर्क लावला जात आहे.
गल्लीतील तरुणांमुळे प्रकार उघड
कोमल सोनवणे हे मुळ निमगाव टेंभी (यावल) येथील रहिवासी असून ते कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत आहेत.तर त्यांच्या पत्नी भारतीबाई या याचठिकाणी साफसफाईचे कामे करतात. आज त्यांच्यासह पत्नी कामानिमित्त घराबाहेर पडले. तर मोठा मुलचा चेतन हादेखील कामानिमित्त बाहेर पडल्याने लहान मुलगा विकी फक्त हाच घरी होता. विकी याने घराचा दरवाजा लोटून घेतला. त्यानंतर साडीने गळा आवळून आत्महत्या केली. दरम्यान गल्लीतील काही तरूणांनी विकी याला आवाज देऊन बोलविण्याचा प्रयत्न केला असता, काही एक प्रतिसाद मिळाला नाही. यानंतर तरूणाने दरवाजा लोटला असता विक्की हा गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला. घटनेची माहिती कळाल्यानंतर कुटुंबातील सदस्यांनी घटनास्थळी धाव घेत आक्रोश केला. पोलिसांना माहिती दिल्यानंतर तरूणाला जिल्हा शासकीय रूग्णालयात आणले असता तपासअंती डॉक्टरांनी मृत घोषीत केले. विक्की इयता दहावी पर्यतचे शिक्षण झाले आहे. तर त्याचा मोठा भाऊ चेतन हा कंत्राट पध्दतीने कंपनीत कामाला होता. या पोलिस कर्मचारी दिलीप सोनार यांनी पंचनामा केल्यावर मृतदेहाचे शवविच्छेदन करुन नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला. घटनेची माहिती मिळताच नातेवाईक तसेच ग्रामस्थानी रूग्णालयात गर्दी केली होती.