लोणी काळभोर । लोणी काळभोरमधील हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या बागुल शहावली (र.) दर्गाह 300 वर्षांहून अधिक जुना आहे. येथे यंदाही सर्व धर्माच्या ग्रामस्थांनी एकत्र येऊन दर्गाह उरूस उत्साहात साजरा केला.
दर्गाह ट्रस्ट व लोणी काळभोर ग्रामस्थांच्या वतीने या उरुसाचे आयोजन करण्यात आल होतेे. ढोलताशांच्या गजरात यावेळी मिरवणूक काढण्यात आली. हा उरूस पाहण्यासाठी तसेच दर्शनासाठी सर्व धर्माचे लोक मोठ्या संख्येने आले होते. पंचायत समिती सदस्य सन्नी काळभोर, दिग्विजय काळभोर, कमलेश काळभोर व ग्रामस्थ, हजरत बागुल शहावली रहे दर्गा ट्रस्ट/कमिटी, अलमगिर जमा मस्जीत ट्रस्ट, रियाज शेख, उपाध्यक्ष शब्बीर पठाण, सचिव वाहिद शेख, गफूर शेख, शकुरभाई शेख, नईम इनामदार, रहेमान इनामदार, मुन्ना इनामदार, निजाम तांबोळी, फिरोज तांबोळी व लोणी काळभोरचे नागरिक याप्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते.