भुसावळ- भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यातील वाहन चालक एएसआय तस्लीम पठाण यांना एएसआय म्हणून पदोन्नती मिळाल्यानंतर त्यांचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे. शहरातील इंण्डियन युनियन मुस्लिम लीगतर्फे त्यांचा गौरव करण्यात आला. याप्रसंगी जनाब सय्यद सादिक अली यांनी पठाण यांच्या कार्याचा गौरव केला. प्रसंगी हकीम खान, डॉ.इमरान रऊफ खान यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान, बाजारपेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक चंद्रकांत सरोदे यांनी पदोन्नतीबद्दल पठाण यांचा गौरव करीत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. प्रसंगी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.