बापरे…महिलेच्या पोटातून काढला चक्क पाच किलोचा गोळा

0

जिल्हा रुग्णालयात डॉक्टरांनी केली यशस्वी शस्त्रक्रिया ः पोट दुखत असल्याने केले होते रुग्णालयात दाखल

जळगाव – पोटात असह्य वेदनांनी त्रस्त असल्याने कुसूमबाई जगन्नाथ सपकाळे (वय 50 रा. भादली बुद्रूक) तिला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. याठिकाणी सोनोग्राफी तसेच सीटीस्कॅन अशा सर्व तपासण्या केल्यानंतर पोटात पाच किलोचा गोळा असल्याचे निष्पन्न झाले होते. जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी यशस्वि शस्त्रक्रिया करुन कुसूमबाई यांच्या पोटातील पाच किलोचा गोळा काढून घेतला आहे.

तालुक्यातील भादली बुद्रूक येथील कुसूमबाई सपकाळे यांच्या पोटात तीन ते चार दिवसांपूर्वी अचानक त्रास व्हायला लागला. त्रास असह्य होत असल्याने त्यांचे पती जगन्नाथ शंकर पाटील यांनी जिल्हा रुग्णालयात दाखल केले.

अडीच तास चालली शस्त्रक्रिया
कुसूमबाई सपकाळे यांना दाखल केल्यानंतर त्यांची सोनोग्राफी करण्यात आली. यानंतर सीटीस्कॅनसह इतरही तपासण्या करण्यात आल्या. या तपासणीमध्ये कुसूमबाई यांच्या पोटात 5 किलोचा गोळा असल्याचे निष्पन्न झाले. यानंतर गुुरुवारी कुसूमबाई यांच्यावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय झाला. डॉ. सुशांत सुपे, डॉ. संगीता गावीत, भूलतज्ञ डॉ. किरण सोनवणे व त्यांचे पथक यांनी अडीच तास चाललेल्या शस्त्रक्रियेनंतर यशस्वीपणे पाच किलोचा गोळा काढला. शस्त्रक्रियेनंतर महिलेवर जिल्हा रुग्णालयातच उपचार सुरु आहे. दरम्यान कुसूमबाई यांचे पती तथा समाजभूषण पुरस्कार प्राप्त जगन्नाथ शंकर सपकाळे यांनी यशस्वी शस्त्रक्रियेबद्दल डॉक्टरांचे आभार मानले. सामाजिक कार्येकर्ते संजय अहिरे, नितीन चौधरी यांनी सपकाळे यांना दाखल, कागदपत्रे तयार करणे अशी सर्व प्रकारची मदत केली.