बाबासाहेबांच्या नावात ‘रामजी’

0

नवी दिल्ली । यापुढे घटनाकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावात रामजी या नावाचा समावेश करून ते डॉ. भिमराव रामजी आंबेडकर असे पुर्ण नाव लिहीले जोणार आहे. उत्तर प्रदेशात बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव भीमराव आंबेडकर असे लिहिले जात होते. आता त्यांच्या या नावात त्यांच्या वडिलांचे नावही समाविष्ट केले जाणार आहे.

रामजी मालोजी सकपाळ हे बाबासाहेब आंबेडकर यांचे वडिल होते. बाबासाहेब आंबेडकर सही करतानाही भीमराव रामजी आंबेडकर अशीच सही करत. त्याचमुळे उत्तरप्रदेशात आता बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव भीमराव रामजी आंबेडकर असे लिहिले जाणार आहे. राज्यपाल राम नाईक यांच्या सल्ल्यानंतर हा बदल केला जणार आहे. महाराष्ट्रात बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव लिहिताना भीमराव रामजी आंबेडकर असेच लिहिले जाते. त्यामुळे उत्तर प्रदेशातही ते तसेच घेतले जावे असे आदेश युपी सरकारने दिले आहेत.