बाबासाहेबांना प्रोत्साहन देणारी स्त्री माता रमाई

0

भुसावळ  । समाजाच्या हितासाठी डॉ. बाबासाहेब आंबेेडकरांचे दडपण पाहून स्वतःच्या सुखासाठी बाबासाहेबांकडून अपेक्षा न करता तसेच औषधाविना गंगाधर, रमेश, इंदूमती व राजरत्न या चार पोटच्या गोळ्यांचं दुःख सहन करत आणि हलाखीचे जीवन जगत असतांना पतीच्या पाठीशी खंंबीरपणे उभे राहून त्यांना प्रोत्साहन देणारी जगातील पहिली स्त्री म्हणजे माता रमाई होय, असे प्रतिपादन रंजिता वानखेडे यांनी केले. गडकरी नगर परिसरातील संत गाडगेबाबा वसतीगृह परिसरात नागवंश बहुउद्देशीय संस्थेतर्फे माता रमाई यांची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी केशव कोराणे, शर्मिला ओमप्रकाश भारती, प्रमिला तायडे यांची उपस्थिती होती.

यशस्वीतेसाठी यांनी घेतले परिश्रम

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी एम.डी. साळवे, एस.एच. तायडे, विजय वानखेडे, धिरज रामवंशी, ओ.पी. भारती, माधवराव कोराणे, भिका तायडे, आर.जी. जंजाळे, माया सावखेडकर, शोभा खरे, सईबाई जाधव, सुनंदा तायडे, सरु तायडे, मनिषा इंगळे, सुमिता कोराणे, सुजाता कोराणे, आशा साळुुंके, संगिता जाधव, शिला जाधव, शोभा पांढरे, पद्मा धवस, लिलावती लहासे आदींनी परिश्रम घेतले.