धुळे। दहशत बसविण्यासाठी वन कर्मचार्यांवर 15 मेंढपाळांनी तुफान दगडफेक केल्याची घटना धुळे तालुक्यात घडली आहे.बोरविहिर ता.धुळे येथील वनपाल शांतीलाल माळीयांनी मोहाडी पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार बाभुळवाडी ता.धुळे गावच्या शिवारातील पाझर तलावाजवळील जंगलात माळी आणि त्यांचे सहकारी शासकिय काम करीत असतांना दहशत बसविण्यासाठी हडसुणे येथील चितांमण धोंंडीराव भिवकर, चिंतामण ठेलारी, बाळू ठेलारी, दयाराम ठेलारी,ईश्वर ठेलारीसह 15 जण हातात लाठ्या-काठ्या घेवून वन कर्मचार्यांवर चाल करुन आलेत.
वन कर्मचार्यांनी पकडलेल्या मेंढ्या पळवून नेल्या तसेच वनकर्मचार्यांवर तुफान दगडफेक काल दुपारी 3 वाजता ही घटना घडली.मोहाडी पोलिसांत आरोपींविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पीएसआय राजपूत करीत आहेत.