बामखेडा येथे अस्वच्छता पसरल्याने नागरिकांच्या जिवाला धोका

0

बामखेडा । शहादा तालुक्यातील बामखेडा हे गाव तीन ते साडे तीन हजार लोकवस्तीचे गाव आहे. या गावात स्वतंत्र ग्रामपंचायत व प्राथमिक आरोग्य उपकेेद्र आहे. मात्र गावात घाणीचे साम्राज्य वाढले असून गावकर्‍यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ग्रामपंचायतीन गावासाठी 4 किमी अंतरावरून पाण्याची व्यवस्था केली आहे. पाइपलाईनमधून गावात पाणीपुरवठा केला जात असतो घाण वाढली असल्याने व पाईपलाईन ठिकठिकाणी फुटलेली असल्याने घाण घुसून दुषित पाणी पुरवठा केला जात आहे. ग्रामपंचायतीने कुपनलिका केली असून पाण्यात क्षारचे प्रमाण अधिक असल्याने ते पाणीपिण्या योग्य नाही. परंतु काही वेळा हे पाणी तापी नदीच्या पाइपलाइनमधून पिण्याचे पाणी म्हणून पाणीपुरवठा होत असल्यामुळे नागरिकांंच्या आरोग्याचा प्रश्‍न निर्माण होत आहे.

आरोग्य केंद्र निरुपयोगी
बामखेडा या गावात प्राथमिक आरोग्य उपकेंद्र असून देखील निरूपयोगी ठरत आहे. गावात 2 रूग्णांना डेंग्यूची लागण झाली आहे. लक्ष्मी किशोर चौधरी, जान्हवी महेश पटेल या दोन्ही मुलींना डेंग्युची लागल झाली मात्र आरोग्य केंद्रात सुविधा उपलब्ध नसल्याने त्यांना खाजगी रुग्णालयात उपचार करावा लागत आहे. बामखेडा गावात असुविधा वाढली असून गावातील सरंपच व ग्रामसेवकांनी याकडे लक्ष देण्याची मागणी ग्रामस्थांमधुन होत आहे. गावाची संख्या मोठी असल्यासने आरोग्य विषयक सुविधा पुरविणे गरजेचे बनले आहे.

2 मुलींना डेंग्यु रोग
दुषीत पाणी पुरवठा होत असल्याने बामखेडा गावात दरवर्षी 2 ते 3 रूग्ण हे डेंग्यू रोगाला बळी पडत असतात. यावर्षी देखील 2 मुली डेंग्यू रोगाच्या बळी ठरल्या आहेत. मात्र या संवेदनशील समस्याकडे ना ग्रामपंचायत ना आरोग्य प्रशासन लक्ष देत आहे. गावाच्या सरपंच लिनाताई मनोज चौधरी हे तालुक्याच्या ठिकाणी राहत असून विकास शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत आहे.