बामखेड्यातील क्वारंटाईनमधील 27 जण घरी परतले

0

शहादा। तालुक्यातील बामखेडा येथील कोरोनाचा संसर्ग झालेल्या  व्यक्तीच्या निकटच्या संपर्कातील २७ जणांना शहादा येथील मोहिदा रस्त्यावरील विलगीकरण कक्षात ठेवण्यात क्वारंटाईन करण्यात आले होते. त्यातील रुग्णाच्या कुटुंबियांसह सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना सर्वांना  घर पाठविण्यात आले आहे.  सरपंच लीना चौधरी,पोलीस पाटील डॉ. योगेश चौधरी आरोग्य सेविका अलका मराठे, संगणक चालक कैलास गवळे,प्रल्हाद कुलथे, आशावर्कर शोभा गवळे रंजना गवळे  व पत्रकार यांनी टाळ्या वाजत त्यांचे स्वागत  केले. त्यांना प्रशासनामार्फत पुढील आठवडाभर होम क्वारंटाईन करण्याच्या सूचना करण्यात आल्या.

पहिल्या दिवशी १६ व्यक्तींचे स्वॅबचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यापैकी कुटुंबातील ११ व्यक्तींच्या अहवाल हे निगेटीव्ह आले होते. नंतर त्यामधील तीन डॉक्टर व दोन ड्रायव्हर असे उर्वरित लोकांचे स्वँब देण्यात आले होते. त्यांचाही अहवाल निगेटिव्ह आले आहेत. या सर्वांना विलगीकरण कक्षातून  घरी पाठविण्यात आले आहे.

बामखेडा येथील एका 45 वर्षीय व्यक्तीला नाशिक येथे उपचारादरम्यान कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल प्रशासनास प्राप्त झाला होता. त्यानंतर नाशिक येथील खाजगी दवाखान्यात कोरोनाचे उपचार सुरु होते. त्यांचा दुसरा अहवाल निगेटिव्ह आल्याने त्याला डिस्चार्ज देण्यात आला आहे.

गावात सर्व व्यवहार सुरळीत*
बामखेडा त. त. येथे गेले 5 दिवसांपासून सर्व गाव लॉकडाउन होते. नागरिकांनीही नियमाचे तंतोतंत पालन केले. परंतु सर्व व्यक्तींचे नमुने हे निगेटिव्ह आल्याने गावात काही अंशी चिंतेचे वातावरण कमी झाले आहे. त्यामुळे गावातील किराणा दुकान, बँक, शासकिय-निमशासकीय कार्यालय,शेती कामे आदी सर्व सोशियल डिस्टनस्टिंगचे पालन करीत सुरळीत सुरु केले आहेत.

गावकऱ्यांनी गाफील न राहता आरोग्यविषयक  पूर्ण काळजी घ्यावी  सोशल डिस्टनस ठेवावे सॅनिटायझर मास्क विना कुणीही विनाकारण गावात फिरू नये, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये,असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र पेंढारकर, डॉ. विजय मोहने, सरपंच लीना चौधरी,पोलीस पाटील डॉ. योगेश चौधरी, मनोज चौधरी यांनी केले आहे.