Bamanod Beat up one : Case Against Eight Suspects यावल : तालुक्यातील बामणोद येथे श्री विसर्जन मिरवणुकीत वाद्य बंद झाल्यानंतर सुरू करण्याच्या कारणावरून एकास आठ संशयीतांनी मारहाण केली. शनिवारी रात्री 12.30 वाजता ही घटना घडली.
डोक्यात मारली फरशी
नितीन किसन राणे (33, नाथवाडा, बामणोद, ता.यावल) यांच्या तक्रारीनुसार, संशयीत आरोपी पंकज साहेबराव सोनवणे अन्य आठ संशयीतांनी चापटा-बुक्क्यांनी मारहाण केली तसेच पंकजने डोक्यात फरशीचा तुकडा मारला तर अन्य आरोपींनी फिर्यादीच्या मंडळाच्या कार्यकर्त्यांवर कोल्ड्रींक्स बाटल्या मारून दुखापत केली.तपास हवालदार गोकुळ बुधा तायडे करीत आहेत.